माझे विचार आपल्याला सूत्रबद्ध वाटले या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद. ते पुस्तक मी पूर्ण  वाचले आहे पण फार फार वर्षांपूर्वी! त्यावेळी लेखकाला काय म्हणायचे आहे, त्याचे "जे कांही आकलन मला झाले आणि माझ्या मनावर पक्के बिंबले " ते मी माझ्या मूळच्या प्रतिसादातच नमूद केले आहे. आपण म्हणता तसा लेख लिहिता आला तर मला आनंदच वाटेल. अध्यात्म आणि त्या प्रांतातील संकल्पना याचे मला फारसे ज्ञान नाही पण आपण आता दोन्ही प्रक्रियांची जी तुलना दिली आहे ती इंटरेस्टिंग वाटली.
      तूर्तास "दर्शन एका वास्तूचे! " या शिर्षकाचा माझा पहिलाच गद्य लेख मनोगतवर लिहून मी श्रीगणेशा केला आहे तो वाचून आपला अगदी रोखठोक अभिप्राय दिलात तर मला लिहिणे कितपत जमते याचा एक अंदाज येईल आणि आपण म्हणता तसे कांही लिहायचे का याचाही विचार करता येईल. धन्यवाद!