परिषदेसाठी सदभावना!

सध्या ह्या  लोकशाहीत आपली खुर्ची जाईल ही भीती जोवर सत्ताधारी लोकांना वाटत नाही तोवर तुमची बाजू कितीही योग्य असलि तरी तुमच्याकडे ते ढूंकून देखिल पाहाणार नाहीत. तोंडदेखले सर्व कांही होईल. तेव्हां तुमच्या रणनीतिचा महत्त्वाचा भाग म्हणून तुमच्या स्थानिक सर्व लोकप्रतिनिधिंवर(कोणत्याही स्तरावरचे व कोणत्याही पक्षाचे असोत) दबाव आणल्याशिवाय कांहीही साधणार नाही. कोठल्याही प्रष्नावर आपली किती मते जातील हाच एकमेव निकष सध्याचे नेते लावतात असे दिसते. न्याय अन्याय योग्य अयोग्य हे त्यांना कळत नाही असे नाही. पण हे निकष त्याना परवडणारे नाहीत. तेव्हा त्यांच्या इलेक्षन-मतांवर घाला येइल असे काहीतरी करा.