मोहब्बत/मोहोब्बत
उर्दूत उच्चार करताना बरीच सूट घेता येते. महब्बत, मुहब्बत, मोहोब्बत हे तिन्ही उच्चार प्रचलित आहेत. कनारा, किनारा हे दोन्ही उच्चार योग्य आहेत.
उर्दूमध्ये शब्द लिहिताना
अक्षरांना इकार-उकार लावायची पद्धत नसते.
हे तितकेसे खरे नाही.सरावाने इकार, उकार, इकार ओळखता येतात. त्यामुळे ज़ेर, ज़बर, पेश लावत नाहीत. कारण लावले नाही तरी चालते. समजून घ्यायचे असते.
लहर-लहेर-लेहर-लेहेर, मुआफ/माफ, युसफ़/युसुफ़ हे उर्दू शब्द दोन-तीन पद्धतींनी लिहिता येतात.
उर्दूत चहरा, लहर असा लिहिले तरी उच्चार चेहेरा, लेहेर असा करतात. कदाचित बिहारी किंवा यूपीतले काही उर्दूभाषक चहरा, लहर असा उच्चार करीत असावेत.
वाकफ़/वाकिफ़, युसफ़/युसुफ़
वाक़फ, युसफ़ हे उच्चार पंजाबी वळणाचे असावेत. यूसूफ़ असेच लिहायला हवे. पंजाबीतही किमान यू दीर्घ हवा. मुआफ़ मधल्या ऐनचा उच्चार केला नाही तरी चालतो.
जाता-जाता
राजप्रासाद, न्यायालयीन खटला, सुवर्णमोहोरा आणि मी असे शीर्षकही चालून गेले असते.