त्यांनी पुरेसे म्हणजे एक चपाती, थोडी भाजी, वाटीभर वरणभात वगैरे खाल्लं नाही म्हणजे ती मुलं अर्धपोटी खेळत आहेत हा समजच चुकीचा!

अगदी खरे आहे! माझ्या मुलीच्या बाबतीत असेच होत असते. वय वर्ष ३. जरा वाभरट आहे... दर २-३ तासांनी काहीतरी नवीन नवीन खायला हवे असते. ती मुख्य करून बेदाणे, काजू, खारीक, सुके अंजीर अगदी आवडीने खाते. जाता येता म्हटले तरी चालेल. त्याचे काही ठराविक प्रमाण हवे का? पोळी भाजी फक्त दुपारीच खाते. रात्री मनात असेल तर भात वगैरे अगदी थोडा खाते (बाकी दिवसभर ज्यूस, नारळाच्या वड्या, बिस्कीटं असलं काहीबाही खात असते) पण आमच्या घरच्या मो ठ्या माण सांनी एकच धोशा लावलेला असतो 'ती काही खात नाही, ती काही जेवत नाही '

कसे समजवावे? तुमचा लेख माहितीपूर्ण आहे. धन्यवाद!
अंजू