नेमके मुद्दे पुढे आणले या चर्चेने.
पण अशा तकलादू किंवा कॉझ्मेटिक वाटणाऱ्या उपायांमुळे मराठी समृद्ध होणार आहे का?इथे मुळातच तुम्ही या उपायांना तकलादू आणि कॉस्मेटिक (दिखाऊ) अशी विशेषणे लावली आहेत. या दोन्ही विशेषणांच्या संदर्भात विचार करता या प्रश्नाचे उत्तर आपसूकच 'नाही' असे येते. अर्थात, त्यापलीकडे -
होणार असल्यास कशी?उत्तर नकारार्थी आहे.
नसल्यास का नाही?शीर्षके अनुक्रमणिकेत अशा रीतीने मराठी केल्याने मराठी समृद्ध होणार नाही. उलटा परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. अशी शीर्षके कसलाच रस निर्माण करत नाहीत आणि त्यामुळे असे लेखन वाचले न जाण्याची, मराठीतले असे लेखन दुर्लक्षित राहण्याची आणि त्यातूनच मराठीची पीछेहाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याविषयीचा विदा मात्र माझ्याकडे नाही. मी हे विधान केवळ अशा काही शीर्षकांसंदर्भात माझ्याच मनात काय भावना निर्माण होतील या आधारेच केले आहे. कदाचित तो माझाही कमीपणा असू शकेल.
मराठीच्या वापराबद्दलचा असा अट्टाहास मराठीच्या निरोगी वाढीसाठी कितपत योग्य किंवा अयोग्य आहे?इथे पुन्हा तसेच अट्टाहास हा शब्द नकारार्थी वाटतो (तसे नसल्यास माझे हे विधान मागे) आणि म्हणूनच हे निरुपयोगी (आणि उलटा परिणाम ध्यानी घेतला तर अयोग्य) आहे.
का बरे टिकून राहावे मुन्नीबाईने?खरे आहे. का बरे टिकून रहावे मुन्नीबाईने असा प्रश्न येणारच असे काही पाहिले की...