जोपर्यंत अमराठी माणसे मराठी माध्यमाकडे तुच्छतेने पाहतील तो पर्यंत फार कठीण आहे.
आता तर नुसत्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांशीच सामना नाही तर इतर सी. बी. एस. ई. , आय. सी. एस. ई बोर्डांशीही सामना
करावा लागतो. तसच जे अमराठी लोक लोंढ्यांनी येतात त्यांची आपले लाचार राजकीय पक्ष जोपर्यंत हांजी, हांजी करत आहेत
तोपर्यंत हे असेच चालणार. अजूनही इंग्रजी माध्यमाच्या शाळातून "ब्लडी व्हर्नाक्युलर लँग्वेज " अशी मराठीची संभावना केली
जाते . हा प्रयत्न लोंढे ताब्यात ठेवता येण्यासारखे होते तेव्हा कदाचित करता आला  असता.  अन्यथा ही आंदोलने वांझोटी ठरती ल.
आपल्या मुलाला चांगली संधी मिळावी  असे प्रत्येकाला वाटत असल्याने इंग्रजी माध्यमाला भाव आला आहे. तशी वस्तुस्थिती
बाहेर आहे पण. मग ही आंदोलनं कशासाठी ? नवीन मान्यता मिळालेल्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आपल्या मुलांना
घातलं तरी पाहिजे. निदान मुंबईततरी परिस्थिती वाईट आहे.  असो. मला जे दिसतय ते लिहिलं आहे. कदाचित आपल्याला
आवडणार नाही.  याला अनेक पैलू आहेत. हा एक संवेदनाशील प्रश्न आहे.