हा मुद्दा मला पटतोय,"तत्सम किरकोळ उपायांमुळे मराठी भाषेचे मराठीपण लगेच वाढणार किंवा घटणार आहे असे "मला पण वाटत नाही,
कारण शेवटी प्रश्न येतो तो मराठी लेखन उत्तमोत्तम होण्याचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचण्याचा... आज एकही माणुस असा सापडणार नाही जो अ ते झ मराठी बोलतो किंवा ऐकतो... ! आपली मराठी संस्कृती ही पहिल्यापासून भाषासहिष्णूतेच्या नावाने प्रसिद्ध आहे (किंवा दुबळी म्हणा हवं तर... ) आधी मोगल, मग इंग्रज .. आपापल्या भाषा येथे पसरवून गेले आणि त्या काळापासुनच हा रिमिक्स जमाना चालू आहे... गाव खेड्यात देखील आता फॅन,कार,मोटारसायकल,बाय,पेन,टायर,बल्ब, मोबाईल, पि.सि.ओ. हे आणि लिस्ट(यादी) ही करता येणार नाही एवढे परभाषीक शब्द वापरात आहेत.. !~
मीराताईंशी सहमत -'काही परभाषिक शीर्षकांना अधिक चपखल मराठी शीर्षके देणे शक्य असते तर काही ठिकाणी लेखकाने दिलेली परभाषिक शीर्षकेच जास्त चांगली वाटतात.'
मी स्वतः देखील लेख लिहिले असताना हा मुद्दा येत असे, पण लेखनातील काही ठळक बाबी आणि निर्देशनामुळे त्या त्या वेळी ते ते शिर्षक अगदी समर्पक ठरते.. समर्पक शिर्षके मराठीत देण्यास शक्य असल्यास मला असे अजिबात वाटत नाही की कोणीही लेखक मुद्दामून परभाषा वापरण्याचा आग्रह धरेल...निदान 'मनोगती' तरी असे करणे केवळ अशक्य !!
आणि "लेखन चांगले आहे की नाही हे ठरवण्यासाठी (तो पुढे वाचावा लागतो) त्याचे शिर्षक आणि पहिल्या १० ओळी कारणीभूत ठरतात" हे सगळेच लेखक/वाचक नक्की मान्य करतील !
मराठीचा आग्रह उत्तमच, परंतु २ -४ परभाषिक शब्दांसाठी संपुर्ण मराठी लेखाची मजा घालवणे योग्य वाटत नाही... क्वचित चपखल परभाषीक शब्द लेखनाची शैली अजून सुधारतात.. त्यामुळे मराठीचे ज्ञान कमी झाले असे मुळीच नाही; पण समर्पक मराठी नाही म्हणून भलतेच भाषांतर करून इंग्रजी/परभाषीक पिक्चर डब करून पाहिल्यासारखे वाटले नाही म्हणजे मिळवले..!!
बाकी प्रशासकांची आज्ञा शिरसावंद्य ! आम्ही आजवर सच्चे मनोगती म्हणून लेखन वाचनाचा आस्वाद घेतला.. घेत राहु !!
आशुतोष दीक्षित.