संजय,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
चर्चा तुम्ही आध्यात्मिकतेकडे वळवलीत.
पण या पुढच्या वळणाशी मला जायचे नाही.
माझा सरळ प्रश्न आहेः
उदा. हल्लीच्या जगातील एखाद्याकडे इंटरनेट आहे, फॅक्स आहे, अत्याधुनिक मोबाईल आहे. जेवायला तो सुसज्ज हॉटेलमधे जातो. पगार नियमित बँकेत जमा होतो.
एके दिवशी त्याच्याशी पत्नीचा वाद होतो म्हणून ती माहेरी निघून जाते.
ती बरेच दिवस आलीच नाही म्हणून काही त्याचे बिघडत नाही. त्याचे जीवन सुरळीत असते.
वीस वर्षांपूर्वी असा माणूस लगेच चार दिवसांनी पत्नीला आणायला गेला असता.
तंत्रज्ञान आले म्हणून माणसांची ओढ संपते?