जेव्हा आपण नातं म्हणतो तेव्हा ती फार वैयक्तिक गोष्ट असते, तो त्या माणसाच्या भावनिक संस्कारांचा परिणाम असतो. तंत्रज्ञानामुळे दुसऱ्या व्यक्तीवर विसंबणं कमी होऊ शकतं पण ओढ कशी कमी होईल? म्हणजे वॉशींग मशीनमुळे कामवाली नाही आली तरी चालेल पण वाद होऊन बायको माहेरी जाऊन कसं चालेल? बायको हे सगळं जरी घरात असेल तरी सारखी आठवत राहील आणि कोण केव्हा माघार घेईल हा ज्याच्या त्याच्या ओढीचा प्रश्न आहे, तो रामायणा पासून आज पर्यंत सारखाच आहे असं नाही का वाटत? बायको हे तुम्ही निर्माण केलेलं नातं आहे त्याचा वस्तू, साधनं, पैसा याच्याशी काय संबंध आहे? आणि असला तर ती फार कठीण अवस्था होईल कारण मग नात्याला काही भावनिकताच उरणार नाही.

संजय