करण्याची वेळ शाळा आणि पालकांवर यावी ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे.
मी व माझी पत्नी दोघेही यात सहभागी झालो होतो.
विद्याताई बाळ, प्रा. वीणा देव, प्रा. प्र. ना परांजपे, दीपा श्रीराम, ज्योती सुभाष, प्रा. म. वि. गोखले, श्री. कौतिकराव ठाले पाटील, डॉ. द. ना. धनागरे, डॉ. जाधव, श्री. पारसनीस सर, डॉ. नीलिमा गुंडी, श्री. म. ना. गोगटे, श्री. कौशल इनामदार या आणि अशा अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आंदोलनाला शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थी, आमच्या सारखेच अनेक पालक व शिक्षक यांचा मोठा प्रतिसाद होता.
शिवसेना, मनसे, रा. स्व. संघ यांच्या प्रतिनिधींनीपण हजेरी लावली आणि पाठिंबा व्यक्त केला.
यातून शासन दरबारी योग्य ती दखल घेतली जावी अशी आशा आहे.