ध्रुवपदाचे भाषांतर:

नायक :घेउन मी - हे वेडे मन
दारोदार - करतो वणवण
नायिका : घेउन मी - हे वेडे मन
दारोदार - करते वणवण
नायक : कधी जराशी - कुठे कडेशी
ये भेटू अंधारी प्रकाऽऽशी ।ध्रु।

पर्याय
१ फिरत असे - सारे त्रिभुवन
किंवा
फिरत असे - अंगण अंगण

इतर सदस्यांनी केलेली भाषांतरे

मिलिंद फणसे :
घेउनिया वेडे हे मन
फिरतो अन्‌ करतो वणवण 
कुठे तरी तू दिवसा रात्री
भेट मज एखाद्या तीराऽऽशी

विदेश :
अपुल्यासंगे वेडे मन  ठिकठिकाणी फिरतो आपण
कुठे जिवलगा कुठल्या तीरी भेट ना काळोखी प्रकाSSशी

प्रशासक कृपया योग्य तेथे बदल करावे. आधीच आभार.