मध्यंतरी काही दिवस ब्रेक घेतलेली पिअर्स साबणाची बाबरछाप जाहिरात गेल्या काही दिवसात दूरदर्शनवर पुन्हा दिसायला लागल्ये. त्यात आंघोळ करताना एका मुलीची आई तिच्याबरोबर बाबराच्या वंशावळीचं स्मरण करते असं दाखवलंय.

बाबर, एक आक्रमक आणि पहिला मोगल बादशहा! तोच बाबर ज्यानी रामजन्मभूमी अयोध्येतलं राममंदीर पाडून तिथे स्वतःच्या नावानी मशीद बांधली! तोच बाबर ज्यानी हिंदूंवर जिझिया कर लादण्याची सुरवात केली.

आपल्याकडे सकाळी उठल्यावर आंघोळ करण्याची नि आंघोळ करताना काही पवित्र नावं घेण्याची पद्धत आहे. त्यांच्या यादीत आता बाबर नि त्याच्या वंशावळीची भर पडणार असं दिसतंय.

बाबराय तस्मै नम: