या विषयावर तथाकथित भविष्यवादी, अध्यात्मवादी आणि स्वयंघोषित तज्ञ अतार्किक गोष्टी शब्दबंबाळ भाषेंत मांडतात व स्वप्नांचे भलभलते अर्थ लावतात. तसें आपण केलें नाहीं. फारच छान. लेख आवडला.

२) बहुतेक स्वप्नं वाईट (nightmarish) असतात.

स्वप्नांत बऱ्याच वेळां मीं रस्ता चुकून अज्ञात प्रदेशांत भरकटतों. आणि खरेंच मीं प्रत्यक्षांत रस्ता चुकण्यांत वाकबगार आहे.

३) एकच स्वप्न पुन्हा पुन्हा पडू शकतं.
अगदीं खरें. मला बालपणापासून मिंच हवेंत उडून अचाट गोष्टी केल्याचें स्वप्न अनेकदां पडतें.

५) स्वप्नं मनातल्या अतृप्त इच्छा पूर्ण करतात.
हेंही खरें. १९८७ च्या क्रिकेट विश्वचषकांतील इंग्लंडविरुद्धचा सामना भारत हरल्यानंतर मीं स्वप्नांत हवेंत उंच उडून ग्रॅहॅम गूचचा झेल घेतला होता.

सुधीर कांदळकर