स्टीफन हॉकिंगच्या दाखल्याची गरज कां वाटावी? पुस्तक अजून प्रकाशित झालेलें नाहीं. अप्रकाशित पुस्तकावरील 'याहू' सारख्या 'माध्यमा'वरील दाखला कितपत विश्वासार्ह आहे हें यथावकाश कळेलच. प्रथम मीं  लेखकाबद्दल पूर्ण आदर व्यक्त करतों. कृपया माझें मत व्यक्तिगत घेऊं नये. तरी  उपरोल्लेखित पुस्तक स्वतः पूर्ण वाचल्यानंतर प्रतिक्रीया आली असती तर चांगलें झालें असतें. अर्थात या क्लिष्ट विषयावरील पुस्तक एकदां वाचून कळणें पण कठीण आहे.

आणखी एक गोष्ट म्हणजे स्टीफन हॉकिंग जरी श्रेष्ठ असले, आणि तसे ते आहेतच, तरी त्यांचा शब्द कांहीं अखेरचा मानतां येत नाहीं. किंबहुना विज्ञानांत कोणताच शब्द अखेरचा मानतां येत नाहीं. तें केवळ अध्यात्मांतच घडूं शकतें. शास्त्रज्ञ कितीही थोर असला तरी त्याच्याही गफलती होऊं शकतात.

सुधीर कांदळकर