१) निराकार इतका डोळ्यासमोर आहे की हॉकिंगच्या दाखल्याची गरज नाही, तो कुणालाही आता, या क्षणी दिसू शकतो

२) मला इतकंच म्हणायचं होतं की ज्या पद्धतीनं मी देव ही संकल्पना मांडली (लेखांक २६) जवळजवळ त्याच लाईन्सवर हॉकिंगची निरीक्षणं आहेत! 

नेहेमी पदार्थ आणि प्रक्रियेशी निगडीत असलेला शास्त्रज्ञ निराकाराची दखल घेतो ही मला अत्यंत आनंदाची गोष्ट वाटली

हॉकिंगची मूळ वाक्यं बघा: 

"गॉड डिड नॉट क्रिएट दि युनिव्हर्स अँड द बिग बँग वॉज ऍन इनएवीटेबल कॉन्सिक्वन्स ऑफ द लॉज ऑफ फिजीक्स"  

"बिकॉज देअर इज अ लॉ सच ऍज ग्रॅविटी, दि युनिव्हर्स कॅन अँड विल क्रिएट इटसेल्फ फ्रॉम नथिंग"

" स्पाँटेनिअस क्रिएशन इज द रिझन देअर इज समथिंग रादर दॅन नथिंग, व्हाय द युनिव्हर्स एक्झिस्टस, व्हाय वी एक्झिस्ट", ...हॉकिंग राईट्स

३) याहू नि ही बातमी टाइम्स मधून छापली आहे त्यामुळे विश्वासार्हते बद्दल मला तरी काही वाटत नाही

४) स्टीफन हॉकिंग अंतिम आहेत असं मी म्हणत नाही ; सत्य, निराकार अंतिम आहे असं मला म्हणायचं आहे!

संजय