शब्द-पट म्हणजे कोडं.. येथे हे वाचायला मिळाले:
आपल्याशिवाय जराही न करमणारे लोक आपल्याशिवाय राहायला शिकलेत, तुम्ही नसलात तरी त्यांना चालण्यासारखं आहे, नव्हे त्यांनी त्यांच्या आयुष्यातून तुम्हाला कायमचं हद्दपार करून टाकलेय ही जाणीव फ़ार त्रासदायक असते. आणि ती थोबाडीत मारल्यासारखी अचानक होते तेव्हा पायाखालची जमीन सरकते..