जर एखाद्या शब्दाचा किंवा शब्द समूहाचा आपण शब्दशः अनुवाद करायचा प्रयत्न केला तर मराठीत अडचण येऊ शकते पण तो अर्थ ध्वनित करायचा ठरवला तर ते सोपं होऊ शकतं, उदा. 'लगी रहो मुन्नीबाई' ला मराठीत 'मुन्नीबाई, चालू दे तुझं' म्हटलं की अपेक्षित 'पंच' येतो; असं लिहायला मजा पण येते.
अर्थात ऑफ-लाईनला अव्यग्रस्थिती किंवा टायपिंगला टंकणे, कंप्यूटरला संगणक, फोनला दूरभाष, मोबाईलला भ्रमणध्वनी म्हणून वाक्य करायला त्रास होतो, भाषेचा डौल देखील कमी होतो.
लेख मजेशीर होता, माझा पर्याय आवडला असेल तर परत प्रयत्न करून बघायला हरकत नाही.
संजय