नेटके लिहिणे, नेमके बोलणे ही भाषेची मूलभूत कौशल्ये आहेत. अनेकदा तीच
दुर्लक्षित राहतात आणि मग भाषा फार सैलपणे वापरली जाते. शालेय मुलांना
लहानपणीच मराठी भाषेची लज्जत चाखत ती अचूकपणे आत्मसात करता यावी, या
उद्देशाने माधुरी पुरंदरे यांनी 'लिहावे नेटके' हा पुस्तकसंच विकसित केला
आहे. त्यांची अत्यंत सुलभ, सुबोध आणि रसाळ शैली आणि 'ज्योत्स्ना प्रकाशन'ची
उत्तम निर्मिती यामुळे
ही पुस्तके लक्षणीय ठरावीत.
नेटके लिहिता यावे,
नेमके बोलता यावे, यासाठी काय करावे? तर- माधुरी पुरंदरे यांचा 'लिहावे
नेटके' हा नवा पुस्तक-संच वाचावा. तो संग्रही ठेवावा. तो सतत वापरावा. आणि
तो प्रमाण मानून मराठी भाषा नेमकेपणाने वापरण्याचा आटोकाट प्रयत्न करावा!
शुभदा चौकर यांचा लोकसत्तामधील लेख