पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गुंडगिरी मोडून काढण्यासाठी पोलिस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. दूध भेसळीसारखे गुन्हेही त्यांनी उघडकीस आणले. एका बाजूला पोलिस अधीक्षकांचे प्रामाणिक प्रयत्न सुरू असताना त्यांना जिल्ह्यातील इतर पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची म्हणावी तेवढी साथ मिळताना दिसत नाही. छाप्याची माहिती फोडण्यापासून पोलिस अधीक्षकांना चुकीची माहिती देण्यापर्यंतचे प्रकार सध्या घडत आहेत. गुन्हेगार आणि राजकीय व्यक्तींशी असलेले अनेक पोलिसांचे संबंध कायम आहेत. त्यामुळेच पोलिस दलातील ही "भेसळ' रोखण्याचे आव्हान पोलिस ...