अमराठी माणसे मराठीत बोलल्यावर आपण का हुरळून जातो तेच कळत नाही.

ज्या भाषेत बोलावयास प्रत्यक्ष ती मातृभाषा असलेले लोकही लाजतात,  त्या भाषेत अमराठी लोक बोलल्यावर आपण हुरळून जाणारच ना????  आता बृहन्महाराष्ट्रमंडळ असे भारदस्त नाव असलेले मंडळ आयोजित करत असलेले कार्यक्रम बघायला आलेल्या माणसांपैकी साधारण ८०% माणसे तरी मराठीच असतील,  तरीही मंडळाला मराठीत न बोलता दुसऱ्या भाषेत बोलावेसे वाटले यातच सगळे काय ते आले.  कदाचित उरलेल्या २०% माणसांची सोय पाहात असतील...

आलेले लोक बहुसंख्य मराठी आहेत हे उस्तादजींच्या लक्षात आले,  बृहन्महाराष्ट्रमंडळाच्या लक्षात कधी येणार??