Nisargvarta येथे हे वाचायला मिळाले:
माणसाची प्रगती माणसाचे अस्तित्व राखण्यास असमर्थ आहे. माणूस निसर्गाचा एक भाग असल्याने निसर्गाच्याऱ्हासाने त्याच्या अस्तित्वास धोका निर्माण झाला आहे. शेती उत्पादन दरवर्षी घटत आहे. त्यामुळे माणसाच्या भुकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून माणसाला निसर्गाला कळवळा येत आहे. शेतीचा कस गेला, दरवर्षी उत्पन्नकमी कमी होत आहे. जंगले भकास झालीत. पशुपक्षांच्या काही जाती कायमच्या नष्ट झाल्या. पाऊस पडतो तेव्हा नद्यांना पूर येतात. पूर ओसरला की नद्या कोरडय़ा ठाक पडतात किंवा शहर कारखान्यांची गटारे म्हणून वाहतात.