मराठीभाषा डॉट कॉम ह्या संकेतस्थळाच्या प्रमुखांनी पारिभाषिक कोशांचा विदा मनोगतासाठी अनुग्रहपूर्वक उपलब्ध करून दिलेला आहे. त्या विदातून शब्द शोधण्यासाठी आंतरपृष्ठाच्या घडणीचे काम चालू आहे.
प्रकाशनपूर्व अवस्थेत ही सुविधा येथे वापरून पाहता येईल. पारिभाषिक शब्दांचा शोध
अद्याप ह्या सुविधेवर बरेच काम करायचे बाकी आहे. तरीही तुमच्या कामासाठी ही सुविधा तुम्हाला वापरून पाहता येईल.
वापरकर्त्यांनी आपापल्या अडचणी व/वा सुचवणी येथेच खाली प्रतिसादाचे स्वरूपात मांडल्यास लवकरात लवकर ही सुविधा अधिकाधिक गुणविशेषांनी युक्त अशी बनवता येईल.
धन्यवाद.