संस्कार याचा अर्थ मनावर बिंबवणे असा आहे त्यामुळे प्रत्येक संस्कार हा बंधन निर्माण करतो. मुंज हा तर जातीय संस्कार आहे तो मुलानी खरंच मनावर घेतला तर तो आपल्याला इतर जातीयांपेक्षा वेगळा मानायला लागतो जे वस्तुस्थितीला धरून नाही.
त्यातून तुमचं लेखन कारण मिमांसा करणारं आहे त्यामुळे तुम्ही केवळ लोकाग्रहास्तव काही कराल असं दिसत नाही.
मुंजीत तीन तोटे होतात : एक पैसा आणि दोन वेळ यांचा अपव्यय आणि तीन लोकांनी दिलेल्या नको त्या वस्तूंची घरात आवक!
लोक काय वाट्टेल ते म्हणोत पण आपल्याला पटेल तेच जर आपण केलं तर आपल्या कृत्याची जवाबदारी आपल्यावर घेण्याची सर्वात चांगली सवय आपल्याला लागू शकते.
संजय