मला तरी येथे कुलदीप पवारांविषयी टीका करणाऱ्यांचे मत पटत नाही !
कुलदीप पवार यांच्या भुमिकांतील वैविध्य वाखाणण्याजोगे आहे !
अस्सल गावरान मराठमोळा गडी (जावयाची जात, इ), फर्मास विनोदी (बिनकामाचा नवरा), शहरी नायक (परमवीर, गुपचुप), गंभीर (अरे संसार संसार) असे अनेक पैलू त्यांनी आपल्या अभिनयातून साकारलेत !
खऱ्या अर्थाने वर्सटाईल अभिनेता ! निदान अतिअभिनय करणारे अशोक सराफ यांच्यापेक्षा तर फार चांगले आहेत !
मराठीत नायक या अर्थाने ते अत्यंत समर्पक अभिनेता होते !
मंदार याच्याशी या अर्थाने सहमत आहे की उगाच फार माहिती नसताना जीभ टाळ्याला लावायचा प्रकार आहे.
मध्यंतरी (२, ३ वर्षांपूर्वी) ईटिवी वर एक मालिका प्रसारित होत होती (हा खेळ संचिताचा) त्यात त्यांनी गावरान नेत्याच्या भूमिकेत जो खुमार आणला त्याला तोड नाही !
या अशा गुणी कलाकाराचं म्हणावं तेवढं कौतुक झालं नाही याचं वाईट वाटतं !