संजय,

प्रश्न अधिक स्पष्ट करतो.

हल्ली बरेच मित्र मैत्रिणी असतात. विवाहाआधी असणारे विवाहानंतरही कायम राहतात. विवाहानंतरही मैत्री जळू शकते आणि तीही कायम राहते.
इंटरनेटमुळे हे सर्व लोक ऑनलाईन असतात. अनेकदा भावंडेही ऑनलाईन असतात. या सर्व लोकांशी गप्पा होत राहतात. पत्नी माहेरी गेली तरी या मित्र मैत्रिणींचा, भावंडांचा सहवास ऑनलाईन मिळू शकतो. त्यामुळे अमुक एका व्यक्तीचाच सहवास पाहिजे, अशी भावना येत नाही. एकटेपणा काही काळ का होईना दूर राहतो. 

तंत्रज्ञान आणि नात्यांचा संबंध आता आपल्या लक्षात यावा.