धन्यवाद अतुल..!
शरद पवार जर खरोखरच साधे भोळे मराठमोळे नेते असतील तर उगीचच मिडिया त्यांच्या मागे का लागेल?
--मेडीयाचे म्हणाल तर "टी आर पी" साठी काय वाट्टेल ते करतात.
त्यांच्यावरच सारखे आरोप का होतात.
-- अहो मोठ्या नेत्यांवर आरोप केल्याने आपण आपसूकच फोकस मध्ये येतो अशी काहीशी भावना असते काही लोकांची, मग काय कोणी पण आरोप करतो, पण सिद्ध कर म्हटले की.......
त्यांच्यावर कोणत्याच पक्षाचा किंवा नेत्याचा विश्वास का नाही?
--काँग्रेसचा आहे की, त्यातही सोनियांनी त्यांच्यावर विश्वास दाखवावा यातच सगळे आले. त्याउपर मागे शिवसेनाप्रमुखांनी पण पवारांना पंतप्रधान होण्यासाठी प्रयत्न केल्यास जाहीर पाठिंबा दिला होता.
फक्त बारामतीत नंदनवन फुलवणाऱ्या नेत्याला महाराष्ट्राचा जाणता राजा कसे म्हणावे? कोलांटउड्या मारण्यात त्यांच्याइतका तरबेज राजकारणी नाही. सगळ्यात कमी विश्वासार्हता असणारा हा नेता आहे.
--साहेबांनी त्यांच्या क्षमतेने जेवढा विकास आणि समृद्धी ह्या राज्यासाठी आणली त्याचापण कुठेतरी विचार झाला पाहिजे.बाकी आरोप;बिनबुडाचे आहेत असे मी मानतो.कृ. रा. न.