प्रतिबिंब येथे हे वाचायला मिळाले:
गेले कित्येक वर्षे चर्चेत असलेला नद्याजोड प्रकल्प भारत सरकारने बासनात गुंडाळला हे जाहीर करून एक नि:श्वास टाकला. त्यावर जनतेने किंवा अन्य राजकीय विचारवंतांनीही कोणत्याच प्रतिक्रिया व्यक्त केल्या नाहीत. हवालदिल शेतकरी राजासुद्धा शांतच राहिला! सध्या भारताच्या गादीवर येणारी शासन किंवा सरकारे ही अल्पमतातील असतात. एकमेकांचा आधार घेऊन घटनेच्या मर्यादांची गोळाबेरीज करून, पाच वर्षांसाठी राज्यकारभार करायचा, इतकेच ध्येय त्यांच्यापुढे असते आणि अन्य विरोधी पक्ष आणि विरोधी नेते सरकारवर सतत आगच ओकत असतात. अशी सरकारे इतक्या मोठय़ा प्रकल्पाचा निर्णय घेण्यास ...