असा संताप येणारे मतदारांच्या संख्येत नगण्य आणि विखुरलेले! सत्तेवर येणारे फक्त मत-विवंचनेत!  भोवताली काय चालले आहे याचे निरिक्षण आणि विचार निरनिराळ्या कारणांनी  करू शकत नाहीत वा करीत नाहीत असेच मतदार प्रचंड संख्येने आहेत. तेच राज्य कोणी करायचे ते ठरवतात. त्यामुळे दहशतवाद्यांनी एवढा नंगा नाच मुंबईत घातला तरीही तीच सत्ताधारी मंडळी मुंबईकरांनी परत सत्तेवर बसवलीच कि नाही? का नाही त्या सर्वांना निवडणूकीत घरी बसवून धडा दिला? अशा परिस्थितीत ते कशाला देशाची काळजी करतील? आपल्या लोकशाही पद्धतीतील व न्यायसंस्थेतील तरतुदींचा पुरेपूर फायदा घेत नेते आपल्या डोक्यावर मिरी वाटताहेत. यथा प्रजा तथा राजा!