इतर आरोपांना आधार आहे की नाही याबाबत मत मांडता येणार नाही. कारण आधार आहेत व नाही आहेत असे म्हणणारे बरेच आहेत.

पण पवारांनी लोकदल का काहीतरी एक पक्ष काढला होता पुर्वी! ती मूळ पक्षातून झालेली फूट होती. त्यानंतर राष्ट्रवादी स्थापन केले. राष्ट्रवादीचा मूळ मुद्दा 'सोनिया - विरोध' हा होता. पण स्थापन झाल्यापासून त्यांची युती आय. काँग्रेसबरोबरच राहिली. संगमांच्या मुलीला सोनियांनी कोणतेतरी पद / खाते दिल्यावर संगमांनी 'राष्ट्रवादीत सामील झालो ही माझी चूक होती' असे उद्गार काढले. तारीक अन्वर यांचे नावच येत नाही. आता शरद पवार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आहेत. हा पक्ष अजूनही काँग्रेसशीच युती करतो. पवारांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन करून 'व्यावसायिक चूक' केली व त्याचा कुणालाही तोटा नाही किंवा तो भ्रष्टाचार नाही हे मान्य! पण ज्या मुद्यावर स्थापन केला त्याच मुद्याशी विसंगत धोरण राबवणे हा भ्रष्टाचार गणला जायला हवा. 

या दोन उदाहरणांवरून शरद पवार हे एक अविश्वासार्ह नेते आहेत अशी प्रतिमा निर्माण झाली. (आहेत की नाहीत यावर प्रत्येकाची मते आपापली)

एकदा अशी प्रतिमा तयार झाल्यानंतर 'कम्युनिकेशन' मध्ये झालेल्या अफाट सुधारणांमुळे अनेक गोष्टी बाहेर निघत राहणार! 

व्यक्तीगत मत - शरद पवार यांच्याबद्दल कळवळा असण्यासारखे काहीही नाही. पवार व असे अनेक लोक हे 'स्वतंत्र देश' हातात मिळाल्यानंतर झळकलेले राज्यकर्ते आहेत. (अर्थात, जनमत पाठीशी आहेच). पण 'परफॉर्मन्स' या एकमेव निकषावर बोलायचे झाले तर बहुतेक सगळे अपयशी ठरलेले आहेत व 'नेते भ्रष्ट असतात' ही प्रतिमा निर्माण करण्यास जबाबदार आहेत. त्यामुळे पवारांबाबत असे आरोप होणे हे 'ओव्हरड्यू, लॉंग पेंडिंग' वाटते. 

धन्यवाद!