सामान्य मध्यमवर्ग हा देशाचा सर्वात मोठा घटक आहे. तो षंढासारखा वागतो आणि राज्यकर्ते सोकावतात. तो जबाबदारपणे वागला, तरच फरक पडू शकेल. या सर्व मुद्द्यांमध्ये "मी काय करू शकतो? " हा प्रश्न उद्भवू शकतो. पण आपली कर्तव्य पार पाडून आणि हक्क बजावूनच एका सुदृढ लोकशाहीचा पाया घातला जाऊ शकतो. नाही तर... चालायचेच...!