सोनियांचा पवारांवर विश्वास नाही. महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी पवारांची गरज आहे म्हणून केंद्रात त्यांना सोबत ठेवावे लागत आहे. ज्यावेळी पवारांची गरज उरणार नाही त्यावेळी पवार काँग्रेसपासून दूर राहतील. सध्या दोघांनाही एकमेकाची गरज आहे. बाळासाहेबांच्या विधानांवर विशेष लक्ष द्यायची गरज नसते. त्यांनीच मैद्याचं पोतं म्हटलेल्या माणसाला ते पंतप्रधानपदासाठी पाठिंबा द्यायला निघाले आहेत याचा अर्थ त्यांना हे माहित आहे की पवार कधीच पंतप्रधान होवू शकत नाहीत.