आपलें हित कशांत आहे तें कळत नाहीं. आतां जेवणाचेंच बघ. मुलांना सगळ्या भाज्या आवडत नाहंत. पण तें बरोबर आहे कां? म्हणून आपल्या आईबाबांचें ऐकावें. ते आपलें हितच पाहतात. अभ्यास बाजूला ठेवून टीव्हीवर कार्टून बघणें बरोबर आहे कां? रोज जेवणाऐवजी नूडल्स नाहींतर पास्ता किंवा पिझ्झा खाणें बरोबर आहे कां? या सगळ्या गोष्टींमुळेंच मुलांना मोठ्यांची म्हणजेच आईबाबांची गरज असते. म्हणूनच मुलें आईबाबांबरोबर राहातात. नाहींतर मुलें एकटीं नाहीं का राहाणार?
असूं देत. चौथीत असून म्हणजे एवढी छोटी असूनही तू मनोगती झालीस, ए... वढा विचार करूं शकतेस त्याबद्दल अभिनंदन.
सुधीर कांदळकर