पवारांनी पुरोगामी लोकशाही दल ( पुलोद) नावाची आघाडी काढून मुख्यमंत्रीपद मिळवले होते.... त्या वेळी काँग्रेस सोडतानाची त्यांची वाक्ये होती, ''राजकारणातून संन्यास घेऊन हिमालयात जाईन, पण कोंग्रेस पक्षात परत जाणार नाही''... तेच पवार राजीव गांधींच्या भेटीनंतर काँग्रेस वासी झाले.
आताही ज्या मुद्द्यावर राष्ट्रवादी स्थापण्यात आलाय.... तो मुद्दाच गौण ठरलाय... तरीही त्याबाबत ''ब्र'' सुद्धा उच्चारला जात नाही.
पवारांचा प्रशासकीय कामाचा उरक, नोकरशाहीवरील जबरदस्त पकड, कृषि, महसूल, शिक्षण, सामान्य प्रशासन, पाटबंधारे आदी खात्यांबाबतचे असामान्य ज्ञान, व्यक्तीसंग्रह, गुणग्राहकता, प्रचंड स्मरणशक्ती व भविष्याची .... काळाच्या पुढचे निर्णय घेण्याची क्षमता.... ह्या बाबी अजिबात दुर्लक्षिता न करता येणाऱ्या आहेत......
भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत कोणत्याही नेत्याबाब्त न बोललेलेच बरे.