धन्यवाद श्रीवत्स,
पवारांनी जर एवढे गंभीर गुन्हे केले असतील आणि सामान्यांपासून आय. बी यंत्रणेला सुद्धा सगळी माहिती आहे, तर मग बाकीच्यांची कसली लाचारी आहे की तो माणूस भ्रष्टाचाराचे कळस गाठेस्तोवर सगळे मूग गिळून आंतरिक चरफड सहन करताहेत.पवारांच्या भ्रष्टतेविषयी बोलण्यापेक्षा त्यांच्यावर टीका करण्याऱ्यांनी हे विसरता कामा नये की आय सी सी सारख्या प्रतिष्ठित कार्यकारणीने त्यांना मानाचे अध्यक्षपद दिलेले आहे, ह्यापेक्षा त्यांच्या सद्गुणी कार्यपद्धतीची काय पावती असणार?पवारांचे निर्गमन होणे असंभव आहे कारण त्यांच्या कार्याने प्रेरित अनेक कार्यकर्ते त्यांचे कार्य अनेकपटींनी वृद्धिंगत करतील.