देशाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या पवारांची गरज नाही किंवा नव्हती असा काळ स्वातंत्र्यानंतर आठवत नाही, परंतु पवार मात्र नेहमीच माध्यमांच्या टीकेचे धनी झालेत. असो... पवार जर एवढे भ्रष्ट आहेत आणि मेडिया वादास जबाबदार नसेल तर त्यांच्या भ्रष्टाचारास आपण सगळे नागरिक जबाबदार नाही का? पूर्ण भारतीय संवैधानीक आणि न्यायालयीन यंत्रणा इतकी सडकी असू शकते की एखादा राजकारणी राजरोसपणे नैतीकतेला गंडा घालू शकतो.. छे.. माझा विश्वास नाही.पवारांवरील आरोपांत तर अजिबात तथ्य नाही.आय. पी एल म्हणाल तर मोदींना जे मिळायला हवे होते ते त्यांना मिळाले. पवारांच्या राजकीय संपर्कांचा, वजनाचा फायदा घेणारे कैक आहेत, आपण त्यांचा चांगुलपणा चेहऱ्याने नाही सांगू शकत. मोदी गेले रसातळाला आणि पवारांना मिळाले आय सी सीचे अध्यक्षपद... यांतच सारे काही आले. धन्यवाद..!