ती स्वयंवरातच वृद्ध होउनी मेली...
नाहीच व्यथेला सुखास वरता आले !

मोजून भलेही ताऱ्यांइतका पैसा....
आकाश कुणाला खिशात भरता आले?


शब्दांचे जंगल तिने सोडले जेव्हा...
कवितेला माझ्या मुक्त बहरता आले!


हे विशेष छान