मला गंमत वाटते की ज्या राजकारण्याला धूर्त, मुरब्बी, धोरणी इत्यादी उपमा दिल्या जातात, ज्याच्या स्वतःच्या नावाने नसली तरी परिवार, वेगवेगळे ट्रस्ट व इतर स्वजनांच्या नावाने गेल्या काही दशकांमध्ये करोडोची संपत्ती लीलया जमा झाली आहे, अनेक ठिकाणी त्या नेत्याची बेनामी मालमत्ता आहे, ती व्यक्ती आपण कायद्याच्या कचाट्यात किंवा कोणत्याही पुराव्यानीशी आपण सापडणार नाही ह्याची खबरदारी घेणारच ना? बिनबुडाचे आरोप नाहीत हे. साहेबांचा वचक एवढा आहे की अधले मधले सगळे लोक सगळं जाणूनही गप्प आहेत. काहींचे हात बांधलेत, काहींना खिशात घातले आहे आणि तरीही ज्यांनी तोंड उघडले त्यांची तोंडे बंद केली आहेत. परस्पर व्यवहार होतात, परस्पर देवाण-घेवाण होते, कागदाचा संबंध येतोच कोठे? आणि साहेबांशीही थेट संबंध येत नाही हो! आता मी ह्याहून जास्त काही बोलू वा लिहूही शकत नाही. कोणी स्टिंग ऑपरेशन केले तरच कळेल. पण तिथेही हात झटकले जातील एवढे निश्चित!