अरुंधती,
'मनोरंजक चर्चा चालू आहे' असे विधान करून 'पार अगदी चर्चा प्रस्तावातली / मूळ लेखनातली हवाच काढून घेतली मी' असा पावित्रा मी अनेक ठिकाणी अनेकांचा पाहिलेला आहे.
आपण त्यांचा वचक, इतरांचे हात बांधलेले असणे, खिशात घातलेले असणे या सर्व बाबी काही निश्चीत पुरावे आपल्याकडे आहेत म्हणून म्हणत आहात की माध्यमांमधून अथवा काहीजणांकडून काही 'मनोरंजक' किस्से ऐकून म्हणत आहात? (निश्चीत पुरावे असणारे काही लोक तरी आपल्या अगदी माहितीतले आहेत का की ज्यांना भेटता येईल व शहानिशा करता येईल? )
मला शरद पवारांबद्दल अनादर असण्याचे कारण हे आहे की विंग कमांडर अमरदीपसिंग कोहली नावाचे एक गृहस्थ व मी सोळा तासांचा दिल्ली पुणे प्रवास एकत्र केलेला होता व पवारांच्या भोपाळ भेटीच्या वेळेस कोहली भोपाळला नियुक्त असताना पवारांच्या गेस्ट हाऊसची व भोपाळ भेटीतील सर्व सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी सांगीतलेले किस्से अजूनही आठवतात व आश्चर्य वाटते. ते किस्से खरे की खोटे हा वेगळा भाग आहे, पण निदान त्यांच्या प्रत्यक्ष सहवासात असलेल्या माणसाने सांगीतलेले होते. किस्से 'न लिहिण्यासारखे' आहेत. आपल्या माहितीत असे काही?
(अवांतर - मनोगतवर मी '२६ जानेवारी २००९, गांधीभवन, हिडीसपणाचा कळस' हा चर्चा प्रस्ताव एकदा दिलेला होता. तो वाचून गांधीभवनातील अक्षरशः पंधरा जणांनी मला गांधीभवनमध्येच मुख्य सभागृहात दमदाटी केलेली होती. आता पवारांबद्दल लिहील्याने तसे काही झाले तर माहीत नाही. पण फिकीर नाही.)
धन्यवाद!