नमस्कार, डॉक्टर गायकवाड,
माझं म्हणणं योग्य व्यक्तिकडे पोचविल्याबद्दल आपले आभार!
प्रतिसादासाठीपण लेखकाचे आभार.
हिटलरवर विडंबनात्मक किंवा विनोदी लेखन ह्याआधिही झालेलं आहे. त्यामुळे 'त्या' स्कीटची मुळ भुमिका सांगण्याची गरज नाही. माझा आक्शेप मी वर सुस्पष्ट नमुद केलेला आहे. पण तरीही त्याचं समर्थन करायचं असेल तर प्रश्नच मिटला. त्या स्कीटच्याच धर्तिवर मग आपण त्या ठमीची गाठ दाऊद, ओसामा यासारख्या लोकांशी घालून देऊ आणि मग 'ज्या माणसानं ट्वीन टॉवर लिलया उडविले त्याला साधे ट्विनस देखिल देणार नाहीस का तु' या धर्तिच्या विनोदाचा आपण निखळ आनंद लुटूया.
कुठलाही संबंध नसताना टिआरपीचा उल्लेख, 'आम्हीही विद्याविभुषित, संवेदनशिल आहोत', 'मी स्वत:च्या चुका शोधण्यात गर्क असतोच' वगैरेबद्दल खुप कौतुक!
आणि शेवटी 'रिमोट तुमच्या हातात असतोच, योग्य ते पाहण्याचा अधिकार आहे' (वेगळ्या शद्वात> लाखो प्रेक्शक आहेत आम्हाला, तु नही ओर सही!) ह्यातून झळकणारा स्वत:विषयिचा कि झी मराठिच्या नावाचा 'अभिमान' यासाठी शिरसावंद्य नमस्कार.
साध्या सोप्या सरळ भाषेत माझी अपेक्शा> झालेल्या चुकीची जाणीव आणि अशी चुक भविअष्यात टाळणे.
परेग.
परेग