हे असले आरोप लालू यादव, फर्नांनडीस, राजीव गांधी, नरसिंहराव , प्रमोद महाजन ह्यांच्यावर ही झाले मग त्यांच्या बाबतीत एवढा पुळका कींवा कळवळा कीती लोकांना आला भोलानाथजीऽऽऽ? पवार म्हणजे काय भारत भाग्यविधाता आहे की काय अस तुम्हाला वाटत? कोणत्या राजकारण्याचे तस्कर लोकांशी संबध असल्याचे उघड झाले आठवत का काही काय आहे भारतीय राज्यघटनेत न्याय व्यवस्था पुरावा मागते आणि पुरावा असला तरी तो ग्राह्य धरायचा की नाही हे ही ठरविण्याचा अधिकार न्यायव्यवस्थेलाच आहे तेंव्हा आपले आरत्या गाणे काय कींवा उर बडवणे काय सगळ्यांना सारखीच कींमत आहे.
मुळात प्रश्न हा आहे की हे गंभीर आरोप का होतात ? ह्या बद्दल लाज नको वाटायला? आपण समाजाला एका दिशेकडे(दशे कडे म्हणायचे होते का? ) नेत आहोत म्हणून आपण नेते आहोत हे तर अभिनेत्यांपेक्षा सरस अभिनेते आहेत ह्या बोटावरच थुंक त्या बोटावर करण्यात ज्यांची हयात गेली अश्या नेत्यांवर जनतेने विश्वास की ती आणि का ठेवावा?
मला वाटत आज शेतकऱ्याच्या माना जेंव्हा फासात आवळल्या जातात तेंव्हा ते दुःख त्याच घरच समजू शकत ह्या भाग्यविधात्यांना कधी कळवळा आला का सांगा ! स्वातंत्र्य हव होत अजून खेड्यात पिण्याच्या पाण्या साठी मैलोन मैल पाई हिंडाव लागत. एक वेळेच्या जेवणाची ज्या समाजात भ्रांत आहे तेथे हे पंचतारकाचे जेवण गिळतातच कसे? आता तुम्ही म्हणाल ह्यात ह्यांचा काय दोष? ह्यांचादोष हाच की हे नेते आहेत, प्रमाणापेक्षा संपत्ती गोळा करत फिरताय आणि तूम्ही मिडियालाच जवाबदार धरताय मला वाटत मग?
माणुस आहे तो पर्यंतच त्याची गरज नंतर काय ? पण आपण आज हि सरदार पटेल, महात्मा गांधी , लालबहाद्दुर शास्री ह्याची उणिव सोसतोय अस काय कार्य आहे ह्याचे की ह्यांची उणिव आपल्याला जाणवेल , आपल्या देशाचा एक पंतप्रधान असेही होते की जे कार्य काला नंतर भाड्याच्या खोलीत राहत होते आणि तिथेच देहावसन पण झाल अस म्हणतात आहे का असा आदर्श आज समाजापूढे एखाद्या नेत्याचा.