खरं बोलावं आणि वागावं हा नैतिक उपदेश आहे आणि तो योग्य आहे पण सत्य या शब्दाचा अर्थ 'सनातनाचा बोध' असा आहे. खरं वागून आणि बोलून तुमच्या मनात काहीही न राहील्यामुळे तुम्ही या बोधाप्रत येऊ शकता पण 'सत्य म्हणजे खरं' असा सरळसरळ अर्थ नाही.

सत्य समजलेला माणूस निर्भय होतो आणि त्यामुळे तो विनासायास खरं बोलतो पण तुम्ही नेहमी खरंच बोलायचं हे बंधन स्वतःवर घालून 'नैतिक-अनितीक' या कल्पनांमध्ये अडकण्याची शक्यता जास्त आहे यामुळे जीवनात प्रचंड तणाव सुरू होऊ शकतो.

जर भारतातला भ्रष्टाचार घेतला तर त्याच मूळ कारण अनिर्बंध लोकसंख्या, त्यामुळे निर्माण झालेला तुटवडा, मग आहे त्यातून स्वतःसाठी जास्तीत जास्त ओढण्याची आणि साठवण्याची वृत्ती आणि मग त्यासाठी करावा लागणारा खोटेपणा असा क्रम आहे.  कल्पना करा जर देशाची लोकसंख्या एकदम निम्मी झाली तर आहे ते इतकं मुबलक आहे की खोटेपणा करायची गरजच उरणार नाही, मग स्वाभिमान, देशप्रेम, पारस्पारिक सौहार्द सगळं एकदम जमून येईल पण लोकसंख्या सोडून इतरच विषयांवर दंगा चालू आहे आणि हाईट म्हणजे काही विचारवंतांनी लोकसंख्या हेच भारताचं ऍसेट आहे असा मुद्दा लावून धरला आहे आणि फक्त उत्पादन वाढवा, इन्फ्रास्ट्रक्चर सुधारा म्हणजे सगळं सुरळीत होईल असं धोरण राबवायचं ठरवलं आहे!

संजय