भूषण, साहेबांना वैयक्तिकपणे ओळखणाऱ्या काहींना मीही ओळखते. त्यांच्या एका अशाच ''ओळख'' असलेल्या माणसाने मध्यंतरी साहेबांबद्दल असेच मनोरंजक (??? ) किस्से ऐकवले होते. ह्या सर्व ''ओळखीच्या'' लोकांना बिझनेसमध्ये टिकायचं असेल तर, स्वतःचा जीव प्यारा असेल तर, साहेबांची मर्जी राखायलाच हवी! आणि त्यांच्याकडेही कसलेच ''कागदी पुरावे'' नाहीत. त्यांना त्रयस्थ व्यक्तींकडून ''निरोप'' येतात. स्थळे, माणसे, वस्तू, व्यवहार ह्यांचा थेट साहेबांशी कोणत्याही कायद्याच्या पुस्तकानुसार संबंध लावताच येणार नाही अशी चोख व्यवस्था असते. बरे, साहेबांवर त्यांचा आकस असेल अशीही परिस्थिती नाही. पण एक मात्र खरे, ते साहेबांना जाम दबकून असतात. न जाणो, साहेबांची मर्जी फिरली तर आपले काही खरे नाही ही भावना असावी बहुधा!