तुम्हाला खरं सांगतो उपाय फार सोपा आहे, 'प्रत्येक पंचवार्षिक योजनेत एक वर्ष 'नो बर्थ इयर' म्हणून आधीच घोषीत करायचं आणि लोकांना ते देशप्रेम किंवा देशावर आलेल्या आपत्तीचा सामना करायचा आहे असं सांगून यशस्वी करायचं आव्हान करायच!'

तुम्ही कल्पना करा फक्त एक वर्ष 'शून्य लोकसंख्या वाढ' असं झालं तर तीन पंचवार्षिक योजनात हा प्रश्न सुटेल. आपण पोलीओ नाही का हटवला?

तुम्हाला अजून एक सांगतो,  जीवनमान सुधारतंय लोकांना कळायचा आवकाश की गरीब लोक सुद्धा उत्सफूर्त प्रतिसाद देतील. मध्यम वर्गीयांना हे केव्हाच जाणवलंय त्यामुळे त्यांचा प्रश्न नाही. पंतप्रधानांच्या कुणा तरी निकटवर्तियाला ही कल्पना सांगायला हवी.

संजय