मुंजीनंतर आश्रमात गुरूपाशी जाऊन विद्या प्राप्त करणे व अध्ययन होईपर्यंत परत न येणे, कडक शिस्त, ब्रह्मचर्य, सात्त्विक आहार वगैरे गोष्टींचे संदर्भ आज राहिलेले नाहीत असे वाटते. मुंजीला "ऑफीसमधल्यांना' बोलावता आले नाही म्हणून नंतर दिल्या जाणाऱ्या पार्टीत जर 'बटू' मटणाची नळी चोखणार असेल अन 'सविता भाभी' या साइटवर आज नवीन काय आले याची सांगोपांग चर्चा मित्रांबरोबर करणार असेल तर मुंज करण्यातला हेतूच साध्य होऊ शकत नाही. (एखाद्याचा मुलगा असे करतो असे मुळीच म्हणायचे नाही, करत असलाच अतर तो 'निव्वळ योगायोग' समजावा.)

संजय क्षीरसागर यांच्याशी पूर्ण सहमत! 

धन्यवाद!