गझलकार येथे हे वाचायला मिळाले:
कविवर्य सुरेश भटांनी आपल्या काव्यलेखनाच्या प्रथमार्धात ज्या एकापेक्षा एक सरस गझला दिल्या, त्यापैकी 'आम्ही' ही एक अविस्मरणीय गझल आहे. 'कविता : विसाव्या शतकाची' या ग्रंथाच्या संपादकांनी त्यांच्या काव्याविषयी जे मूल्यमापन केले आहे, त्याच्याशी कुणाचे दुमत होईल, असे नाही. 'सुरेश भटांनी मराठी गझलेचे पुनरुज्जीवन केले नाही, तर तिला नवी कांती दिली. नवे चैतन्य दिले. भटांच्या कवितेचे नाते माधव जूलियन किंवा मर्ढेकर-मुक्तिबोध यांच्या कवितेशी नसून, केशवसुत-कुसुमाग्रज, श्रीकृष्ण पोवळे यांच्या कवितेशी आहे.' त्यांची कविता 'रोमँटिक, राजकीय-सामाजिक' ...
पुढे वाचा. : ‘आम्ही’ : पुरुषोत्तम पाटील