१० सप्टेंबरला मी युनिलिव्हरला खालील अर्थाचा ई-मेल पाठवला आहे :

"आपली पिअर्स सोपची जाहिरात, जिच्यात एक आई नि तिची मुलगी बाबराच्या वंशावळीचं स्मरण करताना दाखवलं आहे, आक्षेपार्ह आहे. बाबर, जो आक्रमक होता, ज्यानी अयोध्येचं रामजन्मभूमी मंदीर पाडलं नि ज्यानी बहुसंख्याक हिंदूंवर, त्याचा धर्म न स्वीकारल्याबद्दल जिझिया कर लावायला सुरवात केली, तो आमचा भारतीयांचा शत्रू नं. १ आहे. त्याच्या कुठल्याही संदर्भातल्या आठवणीनी (विशेषतः निरागसतेच्या संदर्भात) आमच्या भावना दुखावतात."

यावर उत्तरादाखल युनिलिव्हरनी असं कळवलं आहे की त्यांचा प्रतिनिधी याबाबतीत माझ्याशी संपर्क साधेल. त्यासाठी त्यानी माझा पत्ता नि टेलिफोन नं. मागितला.

त्यावर मी १३ सप्टेंबरला युनिलिव्हरला माझा पत्ता, टलिफोन नं. नि मोबाईल नं. कळवला आहे. त्यांना हेही कळवलंय की तुमचा प्रतिनिधी माझ्याशी मराठीत संभाषण करील असं पाहा.