there is no spoon. येथे हे वाचायला मिळाले:
मी आणि रव्या नेहमी प्रमाणे deccan च्या कट्ट्यावर (ह्या जागेचं आणि माझं काय वैर आहे कुणास ठाऊक) पान-बिडी करत उभे होतो. रव्या पचापच थुंकत होता आणि मी धूर काढत होतो. विषय पण नेहमीचाच काहीतरी, hot पोरी (आपल्याला का मिळत नाहीत), पुण्यातले वाढलेले जागांचे भाव (आपल्याला का परवडत नाहीत), वगेरे चालू होता. रात्री साधारण ११ ची वेळ होती, आणि दिवाळीत पडते तशी मस्त गुलाबी थंडी, ह्या वेळेला गणपतीतच पडली होती.