प्रशज साहेब.........
         पवार साहेबांच्या गुणांचा गुलाल आपण उधळलात, मी आपल्या मतांशी सहमत आहे. त्यांच्या गुणांकडे आदरानेच पाहायलाच हवे.
पण संपत्तीच्या केंद्रीकरनाचे काय? मग लवासा काय, मगरपट्टा काय , नांदेड काय?
        बारामतीत नंदनवन फुलवले मान्य...... पण त्या करीता पुर्व पुरंदर, बारामती शहराचा पाच किलोमीटर चा परिघ सोडल्यास उर्वरीत सबंध बारामती तालुका करपवलाच ना?
तुम्ही पुरावे सादर करायला सांगणे म्हणजे बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल म्हणण्या सारखे आहेत हे ही लक्षात येवू नये काय?   त्यांनी राजकारणाची पद्धत बदलून टाकली. स्व-कर्तूत्वा वर येण्या ऐवजी उपकाराचे राजकारण सुरू केले. सगळ्यांचे हात बरबटून टाकले, उपकारात दबलेला कोणी कशाला विरोधात जाईल? 
          त्यांच्या विरोधातले सगळे आरोप देशाच्या संरक्षणाशी निगडीत आहेत, मग तो  भ्रष्टाचारा सारखा अंतर्गत शत्रू असो वा दाउद सारखा बाह्य शत्रू! त्याच्या गुणांची चुणूक आपणास आय. पी. एल. सारख्या ठिकानी, जिथे फक्त पैसाच पैसा आहे अशा ठिकानीच का बरे दिसते? शेतीखात्यासारखे अत्यंत महत्वाचे, जिथे त्यांच्या गुणांची (प्रशासनावर पकड आदि) खरोखरच गरज आहे तिथे दिसत का दिसत नाही?
बाकी सर्व अरुंधती कुलकर्णी,श्रीवत्स आदिंनी योग्य ते सांगितले आहेच.