मानद पद देण्याची परंपरा आहे. कोणत्याही सेनादलांत परंपरेला शिस्तीइतकाच मान दिला जातो. विविध परंपरा हीच त्या त्या सेनादलाची वेगळी ओळख असते. उदा. प्रत्येक धर्मांतील सण प्रत्येक धर्मांतील सर्व सैनिकानीं व अधिकाऱ्यांनीं साजरा करणें ही भारतीय पायदळाची परंपरा आहे. दिवाळीं, ईद, नाताळ, बुद्धपौर्णिमा इ. सण सर्व धर्मीय जवान आणि अधिकारी साजरा करतात. मुस्लिमांबरोबरच कित्येक हिंदू, ख्रिस्ती जवान आणि अधिकारी रमझानांत रोजे पाळतात.
आपल्या हवाई दलानें पूर्वीं कपिल देवला ग्रूप कॅप्टन केलेलें आहे. यांत सेनादलाची जाहिरात आणि खेळाडूचा बहुमान असा दुहेरी लाभ होतो. सेनादलाकडे जास्त तरुण वळतात आणि खेळाडूंना असामान्य कामगिरी करायला प्रोत्साहन मिळतें.
ब्रिटन तर नाईटहूड हा किताब ब्रिटनबाहेरच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांना देते. उदा. अँटिगा आणि वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू सर व्हीव्हिअन रिचर्डस.
सुधीर कांदळकर