पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
राजकारणासाठी दलितांचा वापर करण्याची पद्धत आपल्याकडे नवीन नाही. निवडणुकीत मते मिळविणे, खोट्या गुन्ह्यांत विरोधकांना अडकविण्यापासून गावात दंगल घडविण्यापर्यंत दलित कार्यकर्त्यांचा वापर केला जातो. गावापासून देशाच्या राजकारणापर्यंत हे प्रकार चालतात, ही गोष्ट आता नवीन राहिलेली नाही. दलितांवरील अत्याचाराच्या घटना वाढण्यामागे ही जशी राजकीय कारणे आहेत, तशी सरकारी अनास्थाही यामागील एक प्रमुख कारण आहे. महसूलसह इतर विभागांनी गाव पातळीवर वादाचे कारण ठरणाऱ्या काही घटनांची वेळीच दखल घेऊन कारवाई केली, तर दलितांवरील अत्याचाराच्या बहुतांश घटना टाळता येऊ ...